Pimpri: चालक बघून हसल्याने तरूणीची रिक्षातून उडी

एमपीसी न्यूज – रिक्षातून प्रवास करत असताना तरूणीकडे बघून रिक्षा चालक हसत असल्यामुळे तिने चालकाला रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, चालकाने रिक्षा न थांबवल्याने घाबरलेल्या तरूणीने रिक्षातून उडी मारली. ही घटना पिंपरीतील अजमेरा येथे नुकतीच घडली.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी 22 वर्षीय तरूणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा (एमएच14, सीयु 3318) यावरील चालक समीर शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी आरोपीच्या रिक्षातून प्रवास करत होती. आरोपी तरूणीकडे बघून वारंवार हसत होता. तिने आरोपीला रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, त्यानंतरही त्याने रिक्षा थांबवली नाही. त्यामुळे घाबरलेल्या तरूणीने रिक्षातून उडी मारली. यामध्ये तरूणीच्या डोळ्याला, दोन्ही हातांना, पायांना मार लागला. आरोपीने तिची बॅग, तीन हजारांची रोकड, कपडे, कागदपत्रे असा ऐवज चोरून नेला. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.