Pimpri : इन्व्हायर्मेंट कन्झर्वेशन असोसिएशन (ECA) संस्थेमार्फत ‘स्वच्छ भारत’बाबत जनजागृती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात “स्वच्छ शहर” जनजागरण आणि प्रबोधन मोहिमेत इन्व्हायर्मेंट कन्झर्वेशन असोसिएशन (ECA) हि सामाजिक संस्थेमार्फत जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियानात २६ सप्टेंबरला शहरातील लहान-मोठ्या बहुसंख्य शाळा रस्त्यावर उतरून घरोघरी जावून आणि कुटुंबभेटी घेऊन सहभागी झाल्या होत्या.

या उपक्रमासाठी विकास पाटील, गजानन चिंचवडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य अधिकारी दरवडे व इंदलकर, न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका योगिता बनकर, कांदळकर किशोरी, गर्जे छाया, कट्टे जया, तिटकारे प्रियंका, सुलाखे, ठोंबरे, कविता तिखोळे, तांबोळी रिझवाना, किशोरी कांदळकर, सोनाली दळवी, प्रतिमा साबळे, वैशाली दिघे, चित्रा पोटवेकर, कमल पावसे, अनघा दिवाकर, मीनाक्षी मेरुरकर, संगीता घोडके, अनिल दिवाकर, इंद्रजीत चव्हाण, हर्षदा पाटील व आनंद गुप्ता आदी सर्वजण उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मालकीच्या आणि खासगी शाळामधील विद्यार्थ्यामार्फत शहरातील शाळा परिसरातील नागरवस्तीत जाऊन पर्यावरण विषय जनजागृती उपक्रम मागील अनेक वर्षापासून पर्यावरण संवर्धन समिती यशस्वीपणे राबवीत आहेत. त्यातून आपल्या शहरातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पर्यावरण संवर्धन प्रेम व शहर स्वच्छ विषया बाबत आपुलकीचे दर्शन घडत आहे .

जनजागरण व प्रबोधन प्रभातफेरीची सुरुवात सकाळी ९ वाजता चाफेकर चौक येथून झाली. हि प्रभातफेरीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल, युनिक व्हिजन स्कूल आणि मनोरम इंग्लिश मेडियम स्कूल या चिंचवडगांव परिसरातील शाळा समाविष्ट झाल्या होत्या. ५०० पेक्षा जास्त विध्यर्थी व शिक्षक जागरणात सामील झाले होते.

प्रभातफेरीमध्ये स्वच्छ शहर सुंदर शहर, ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिक वापर नियंत्रण, परिसर स्वच्छता आणि महापलिका कचरा संकलन विभागास सहकार्य आदीबाबत घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी स्थानिक रहिवाशांचे रहिवास्यांचे प्रबोधन केले.

याप्रसंगी चिंचवडे यांनी शहर स्वच्छ ठेवल्यास होणारे फायदे, घाणीमुळे होणारे आजार यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिक वापर नियंत्रण, महापालिका कचरा संकलन विभागास सहकार्य आदी विषयांवर विकास पाटील यांनी मार्गदर्शन केले. शाळा स्वच्छता, परिसर स्वच्छता याविषयी थोडक्यात माहिती मीनाक्षी मेरुरकर यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. शेवटी दिवाकर यांनी उपस्थित मान्यवरांचे व शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.