Pimpri: तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती

Awareness about the ill effects of tobacco

इंडियन डेंटल असोसिएशन पिंपरी चिंचवड शाखेचा उपक्रम

एमपीसी न्यूज – जागतिक तंबाखू निषेध  दिनाच्या निमित्ताने (31 मे )इंडियन डेंटल असोसिएशन पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने शहरातील मुख्य चौकांमध्ये  असोसिएशनच्या सदस्यांनी तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत फलक दाखवून जनजागृती केली.  

इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. यशवंत इंगळे , डॉ. संदीप भिरुड ,आणि डॉ.सुमंत गरुड यांनी तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल माहिती दिली. स्वतः तोंडाच्या कर्करोग पूर्वलक्षणाबाबत तपासणी करण्याबाबत मार्गदर्शन केले.

तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने  इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने शहरातील मुख्य चौकात कार्यरत असणाऱ्या पोलीस, वाहतूक पोलीस यांना  सॅनिटायझर आणि फेस मास्क यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ. संतोष पिंगळे,  डॉ. दीपाली पाटेकर,  डॉ. शिवाजी चव्हाण, डॉ. निखिल अगरवाल, डॉ. पूजा माने, डॉ. शलाका जाधव उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या कालावधीत केंद्र आणि राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील तंबाखू, सिगरेट आणि तंबाखू युक्त पदार्थ विकणाऱ्या दुकाने बंद असल्यामुळे तंबाखू व्यसनाधीनता काही प्रमाणात कमी झाली  आहे.

अशाच प्रकारे राज्य शासनाने महाराष्ट्रामध्ये काळ्याबाजाराने विकल्या जाणाऱ्या आणि बंदी असलेल्या तंबाखूयुक्त पदार्थांवरील निर्बंध कडक करावेत यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशी मागणी तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने  इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. यशवंत इंगळे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.