Pimpri : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वतीने जनजागृती कार्यक्रम

एमपीसी न्यूज – जागतिक तंबाखू विरोधी (Pimpri) दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये बालक, पालक, सामाजिक संस्था, झोपडपट्टी समन्वयक, सामाजिक कार्यकर्ते, महिला गृहिणी कमिटीच्या सदस्या, पोलिसांनी सहभाग घेतला.

शहर पोलीस हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यात झोपडपट्टी भागात गृहिणी समिती, बालकल्याण सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी व्यसनमुक्ती कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील ठिकठिकाणी हे कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी विल्यम साळवी, वंदना वाघमारे, डॉ. राजीव नगरकर, मंदार शिंदे, परम आनंद, सचिन करंजुले आदि उपस्थित होते.

Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

शहरातील 11 ठिकाणी जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे महत्व सांगून तंबाखू सेवनाचे मानवी शरीरावरील दुष्परिणाम, व्यायाम, आहाराचे फायदे, बालकांची सुरक्षा, शिक्षण, व्यसन अशा विविध विषयांवर माहिती देण्यात आली. जनजागृती कार्यक्रमात 312 बालक, 168 पालक, पाच सामाजिक संस्थांचे 10 प्रतिनिधी, 28 झोपडपट्टी समन्वयक, सामाजिक कार्यकर्ते, 26 महिला गृहिणी कमिटी सदस्या, 27 पोलीस अधिकारी व अंमलदार अशा एकूण 571 जणांनी सहभाग घेतला. सर्वांनी यावेळी ‘आपण सर्वजण राष्ट्राची संपत्ती असून व्यसन करणार नाही’ अशी शपथ घेतली.

 

कार्यक्रमाचे आयोजन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, विशेष बाल पथकाचे नोडल अधिकारी सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार, पोलीस शिपाई कपिलेश इगवे, संपत निकम, दिपाली शिर्के, अमोल मुठे, भूषण लोहरे यांनी (Pimpri) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.