Pimpri: पुण्याच्या सहपालकमंत्रीपदी बाळा भेगडे यांची लवकरच नियुक्ती; माझे सर्व अधिकार भेगडेंना – चंद्रकांत पाटील 

एमपीसी न्यूज –  कामगार, पुनर्वसन राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांची पुणे जिल्ह्याच्या सहपालकमंत्री म्हणून लवकरच नियुक्ती होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली. तसेच माझे सर्व अधिकार भेगडे यांना दिले असल्याचेही पाटील म्हणाले. 

पुणे जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीचा पाटील यांनी आज (मंगळवारी) बालेवाडी येथे आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

  • भाजप-शिवसेना सरकारने प्रत्येक जिल्ह्यात सहपालकमंत्री नेमले आहेत. बाळा भेगडे यांची मागील महिन्यात राज्य मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्यांच्याकडे कामगार, पुनर्वसन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांची नुकतीच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे.  पाटील दुस-या क्रमाकांचे मंत्री असून त्यांच्याकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम हे महत्वाचे विभाग आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री देखील तेच आहेत.

कामगार, पुनर्वसन राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांची पुण्याच्या सहपालकमंत्री म्हणून लवकरच नियुक्ती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेत असल्याने त्यावर अद्याप त्यांची स्वाक्षरी झाली नाही. ती लवकरच होईल, असे पाटील यांनी सांगितले.  तसेच माझे सर्व अधिकारी भेगडे यांना आहेत,असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.