Pimpri : वंचित बहुजन आघाडी युवक आघाडीच्या शहर उपाध्यक्षपदी बाबासाहेब जोगदंड

एमपीसी न्यूज – वंचित बहुजन आघाडी युवक आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष पदावर बाबासाहेब जोगदंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र शहराध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी दिले.

शहराध्यक्षांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे कि, बाबासाहेब जोगदंड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. पक्ष वाढीसाठी संघटनात्मक काम करून समाजातील वंचित समूहातील घटकांना पुढील काळात सोबत घेऊन काम करावे. रविवारी (दि. 3) जोगदंड यांना त्यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like