Pimpri : रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या अध्यक्षपदी बहार शहा

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या अध्यक्षपदी बहार शहा यांची निवड करण्यात आली तर सचिवपदाची सुत्रे संजय सिंघानी यांच्याकडे देण्यात आली आहे. 

रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचा पदग्रहण समारंभ रविवार (दि. 30)  पिंपरी येथील रोटरी सेंटरमध्ये पार पडला. यावेळी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणची 2019-2020 या पुढील वर्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी डिस्ट्रिक्ट गर्व्हनर 2020-21 च्या रश्मी कुलकर्णी, असिस्टंट गर्व्हनर सतीश आचार्य, जितेंद्र शर्मा, रोटरी क्लब ऑफ  निगडीचे नियोजित अध्यक्ष विजय काळभोर, पीसीएमसी इंडस्ट्रियल टाऊनचे नियोजित अध्यक्ष जसविंदर सोखी, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अॅड. सोमनाथ हरपुडे, रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे जिग्नेश अगरवाल, रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे कृष्णा सेहगल आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

या कार्यकारिणीमध्ये सचिवपदी संजय सिंघानी, खजिनदार गविन अॅन्थोनी, प्रेसिटेंड इलेक्ट आदिती जोशी, वैजयंती आचार्य, दीपा लंके, शैलेश बोकील, सचिन कोल्हे, मेबल अॅन्थोनी, अजय जैन, दीपा जावडेकर, सुधीर शितोळे, नवीन वर्मा, अभिषेक जांभुळकर, विलास गावडे यांची निवड करण्यात आली.

मावळत्या अध्यक्षा वैजयंती आचार्य यांच्याकडून बहार शहा यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. बहार शहा म्हणाले, रोटरी क्बल ऑफ प्राधिकरणच्या वतीने पुढील वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. या क्लबच्या माध्यमांतून समाज उपयोगी कार्य सुरु आहे.   त्यानंतर रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणसोबत विविध विषयांवर काम करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.