Pimpri : सराईत गुंड बज्या वाघेरे पुणे जिल्ह्यातून हद्दपार

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड बजरंग वाघेरे उर्फ बज्या याला पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी केली.मागील काही महिन्यांपासून बज्या वाघेरे अंडर ग्राउंड झाला होता. 12 नोव्हेंबर रोजी त्याने दारूच्या दुकानात काम करणा-या व्यवस्थापकाला पिस्तुलाचा धाक दाखवला.

‘मी कोण आहे माहिती नाही का, बजरंग वाघेरे कोणालापण विचारा’ असे म्हणून बियर मागितली. त्यावर व्यवस्थापकाने पैसे मागितले. असता त्याने कंबरेला लावलेले गावठी पिस्तूल दाखवून दहशत माजवली. त्यामुळे भेदरलेल्या व्यवस्थापकाने त्याला विरोध केला नाही. याचा फायदा घेत बज्याने दुकानातील 10 बियर आणि गल्ल्यातील 4 हजार 500 रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली.

याप्रकरणी त्याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.बज्या ने अगदी कमी वयात असतानाच गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले आहे. 2007 साली त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर बज्या वर खून, दरोडा, लुटमार, मारामारी, घातक शस्त्र बाळगणे असे असे सुमारे 20 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपीची गुन्हेगारी शहरात फोफावल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्याची दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे पिंपरी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव तयार केला. महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये त्याला एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस शिपाई सुहास डंगारे, पोलीस शिपाई गणेश कर्पे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.