Pimpri : शास्तीकराबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांवर लावलेला शास्तीकर सरसकट माफ करावा ही नागरिकांची रास्त मागणी आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करु असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसचे शिष्टमंडळ मंगळवारी (दि. 11) मुंबईत महसूल मंत्री थोरात यांना भेटले. यावेळी साठे यांनी शहरातील नागरिकांवर लादण्यात आलेला शास्तीकर सरसकट रद्द करावा अशा मागणीचे पत्र थोरात यांना दिले.

यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष गौतम आरकडे, महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, प्रदेश कार्यकारीणी सदस्या निगार बारसकर, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, शाम अगरवाल, प्रदेश युवक सरचिटणीस मयूर जयस्वाल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकर यादव, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शहर उपाध्यक्ष ॲड. क्षितीज गायकवाड, सज्जी वर्की, सुनील राऊत, किशोर कळसरकर, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे, वकीलप्रसाद गुप्ता आदी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2
You might also like