Pimpri: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित करताना खबरदारी घेणार- आयुक्त हर्डीकर

Pimpri: Be careful while evacuating people near river on the background of Corona says pcmc Commissioner shravan Hardikar

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नद्या वाहतात. पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नदी काठच्या रहिवाशांचे महापालिकेच्या वतीने स्थलांतरण केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा स्थलांतरण करताना अधिक सतर्कता बाळगली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, पावसामुळे पवना, मुळा, इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्याची गरज पडली.

तर, महापालिका शाळेत त्यांचे स्थलांतर करण्याचे नियोजन आहे. स्थलांतरित करताना सुरक्षित अंतर पाळले जाणार आहे. त्यासाठी जास्त शाळांमध्ये कमी लोकांना ठेवावे लागणार आहे.

पूर्वी एका शाळेमध्ये जेवढे नागरिक ठेवत होतो. आता तेवढे नागरिक चार शाळांमध्ये ठेवावे लागणार आहे. त्यादृष्टीने व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्याठिकाणी किट ठेवण्यास सांगितले आहे. कारण, स्थलांतरित लोक थोडेफार कपडे घेवून येतात. पण, प्रत्येकाकडे मास्क, सॅनिटायझर असण्याची शक्यता नाही. त्यामुळे जिथे केंद्र केले जातील. तिथे मास्क, सॅनिटायझर ठेवण्यात येणार आहे, असे हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like