BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण

170
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – क्रीकेट खेळताना महिलेला चेंडू लागला. त्यामुळे महिलेने चेंडू घरी नेला. या कारणावरून आरोपीने महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केला. ही घटना संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी 57 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सतिश लोहकरे (रा. संततुकाराम नगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गल्लीमध्ये क्रिकेट खेळत होता. यावेळी त्याचा चेंडू फिर्यादी महिलेला लागला. महिलेने चेंडू लागल्याच्या रागातून चेंडू घरी नेला. याचा आरोपीला राग आला. यातून आरोपीने महिलेचा उजवा हा पिरगाळला. महिलेला लाथ मारली. तसेच फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.