Pimpri : किरकोळ कारणावरून दाम्पत्याला मारहाण

Beating couple for petty reasons

एमपीसी न्यूज – महिलेने घराच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे शेजारी राहणार्‍या एकाने महिलेच्या घराच्या दिशेने हॅलोजन बल्ब बसविले.  यावरून झालेल्या वादातून दोघांनी एका दाम्पत्याला मारहाण केली. ही घटना रहाटणी येथे नुकतीच घडली.

याप्रकरणी शशिकला शिवाजी क्षीरसागर (वय-39, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जमाल खान, आसमा जमाल खान (रा. रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी शेजारी राहण्यास आहेत. फिर्यादी यांनी घराच्या बाहेर रस्त्याच्या दिशेने सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. त्यामुळे आरोपीने फिर्यादी यांच्या घराच्या दिशेने हॅलोजन बल्प लावले.

या बल्पचा प्रकाश फिर्यादी झोपताना त्यांच्या डोळ्यावर येत होता. त्यामुळे त्यांनी बल्प बंद करण्यास सांगितला. त्यावरून चिडलेल्या आरोपीने त्यांना शिवीगाळ करत हाताने, उलथाण्याने मारहाण केली.

यामध्ये त्यांचे गळ्यातील मंगळसुत्र हरवले. आरोपी आसमा हिने फिर्यादी यांच्या पतीस शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.

वाकड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.