Pimpri : मुलीच्या विनयभंगाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आई-वडिलंना मारहाण; आरोपी अटकेत

Beating of parents who went to ask for an answer to the girl's molestation; Accused arrested

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या तरुणाला मुलीचे आई-वडील जाब विचारण्यासाठी असता तरुणाने त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 16) रात्री पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

राहूल खाटीकमारे (वय 32, रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या 35 वर्षीय वडिलांनी बुधवारी (दि. 17) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खाटीकमारे याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केले. वेळोवेळी तिचा पाठलाग केला.

याबाबत फिर्यादी आणि त्यांची पत्नी जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.