Pimpri: शहरातील ‘या’ खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत बेड

Beds are available for Kovid patients in 'This ' private hospital in the city : पालिकेच्या कोविड 19 'डॅशबोर्ड'वर आजपासून माहिती प्रसिद्ध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोविडसाठी उपलब्ध असलेल्या शहरातील खासगी रुग्णालयातील बेडची माहिती पालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in/ या संकेतस्थळावरील कोविड 19 ‘डॅशबोर्ड’वर आजपासून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. आज 15 रुग्णालयातील उपलब्ध बेडची माहिती देण्यात आली आहे.

पालिकेच्या डॅशबोर्डवर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार मोशीतील संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलची क्षमता 40 बेडची आहे. त्यातील 33 बेड उपलब्ध आहेत. चिंचवड येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलची क्षमता 100 बेडची आहे. यापैकी 65 बेड उपलब्ध असून त्यामध्ये 22 आयसीयू तर 44 आयसोलेशन बेडचा समावेश आहे.

नेहरुनगरमधील आयुष हॉस्पिटलची 26 बेडची क्षमता आहेत. यातील 15 बेड उपलब्ध असून त्यात 5 आयसीयू आणि 10 आयसोलेशन बेडचा समावेश आहे.

तर, पिंपरीतील आयुश्री हॉस्पिटलची 26 बेडची क्षमता आहे. त्यातील 18 बेड शिल्लक आहेत. त्यामध्ये आयसीयूचे 6 आणि आयसोलेशनचे 12 बेड आहेत.

भोसरीतील देसाई हॉस्पिटलमध्ये 82 बेड आहेत. त्यापैकी 10 आयसीयूचे आणि 72 आयसोलेशनचे असे सर्वंच 82 बेड उपलब्ध आहेत.

डॉ. डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेज ॲन्ड हॉस्पिटलची 300 बेडची क्षमता आहे. त्यातील 162 बेड शिल्लक आहेत. त्यामध्ये आयसोलेशनच्या 165 बेडचा समावेश आहे. आयसीयूचा एकही बेड उपलब्ध नाही.

वाकडमधील ग्लोबल हॉस्पिटलची 31 बेडची क्षमता असून 6 आयसीयू, 25 आयसोलेशन असे सर्वंच 31 बेड उपलब्ध आहेत.

वाकड येथीलच गोल्डन केअर हॉस्पिटलची 48 बेडची क्षमता आहे. त्यातील 6 आयसीयू आणि 42 आयसोलेशन असे सर्वंच 48 बेड उपलब्ध आहेत.

वाकड मधीलच लाईफ पॉंईन्ट हॉस्पिटलची 100 बेडची क्षमता आहे. त्यापैकी 5 आयसीयू आणि 72 आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत.

चिंचवडमधील लोकमान्य हॉस्पिटलची 84 बेडची क्षमता आहे. त्यातील फक्त 2 आयसीयूचे बेड उपलब्ध आहेत. रुग्णालय ‘ओव्हरफ्लो ‘ झाले आहे.

आकुर्डीतील स्टार हॉस्पिटलची 60 बेडची क्षमता असून आयसोलेशनचे 51 बेड उपलब्ध आहेत. आयसीयूचा एकही बेड शिल्लक नाही.

मोशीतील सेवाधर्म हॉस्पिटलची 41 बेडची क्षमता आहे. त्यात 7 आयसीयू आणि 34 आयसोलेशन असे सर्वंच 41 बेड उपलब्ध आहेत. स्टार हॉस्पिटलची 60 बेडची क्षमता आहे. त्यात 51 आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत. आयसीयूचा एकही नाही.

निगडी- प्राधिकरणातील स्टर्लिंग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची 70 बेडची क्षमता आहे. त्यापैकी 4 आयसीयू आणि 51 आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत.

भोसरीतील विवेकानंद हॉस्पिटलची 42 बेडची क्षमता आहे. त्यातील 7 आयसीयू आणि 23 आयसोलेशन असे 30 बेड उपलब्ध आहेत.

चिखलीतील गुंजकर हॉस्पिटलची 65 बेडची क्षमता आहे. त्यापैकी 18 आयसीयू आणि 47 आयसोलेशन असे 65 बेड उपलब्ध आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.