BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : कार्यशाळेस मेंदू तज्ज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज ऍण्ड हायटेक हॉस्पिटल आणि मिडवेस्ट चॅप्टर ऑफ न्युरोलॉजिकल सर्जनस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यशाळेस मेंदू तज्ज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेंदू आणि मणका तज्ज्ञ प्रेमानंद रामाणी, डॉ. सुशील पाटकर, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या मेंदू व मणका रोग विभागप्रमुख डॉ. दीपक रानडे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ रानडे यांनी मणक्‍यावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिके करून दाखवले.

  • वैद्यकीय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. रानडे म्हणाले की, क्‍युसा, न्यूरोनॅविगेशन, स्टिरीओटटॅक्‍टिक सर्जरी, डीप ब्रेन स्टिम्युलेशन, गामा नाइफ, अवेक ब्रेन सर्जरी अशा विविध आधुनिक सुविधा न्युरो सर्जरी या क्षेत्रात आल्यामुळे शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यामध्ये खूप उत्क्रांती होत आहे.

यावेळी डॉ. रामाणी आणि डॉ. पाटकर यांनी देखील मणक्‍याच्या शस्त्रक्रियेत पेडिकल स्क्रू घालण्याचे प्रात्यक्षिके करून दाखवले. या कार्यशाळेत 200 मेंदूतज्ज्ञ सहभागी झाले होते.

HB_POST_END_FTR-A2

.