Pimpri : प्रत्येक स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी उत्तम आरोग्य आवश्यक – निहाल पानसरे

स्व. फकीरभाई पानसरे राज्यस्तरीय स्पोर्टस्‌ मिटचे उद्‌घाटन

एमपीसी न्यूज – जीवनातील प्रत्येक स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी उत्तम आरोग्य आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने शिक्षणा एवढेच व्यायाम आणि खेळांना महत्व दिले पाहिजे. समाजाचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी नेहमी कष्ट घेणा-या डॉक्टरांनी हा संदेश सर्वदूर पोहचवावा. या उद्देशाने स्व. श्री फकिरभाई पानसरे एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने वेळोवेळी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष निहाल आझमभाई पानसरे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड मधील स्व. श्री फकीरभाई पानसरे एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ महाराष्ट्र स्टेट इंटर कॉलेज फिजीओथेरपी स्पोर्टस्‌ मिट 2019 ’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्‌घाटन संस्थेचे विश्वस्त निहाल आझमभाई पानसरे यांच्या हस्ते मशाल प्रज्ज्वलीत करुन करण्यात आले.

  • निगडी प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर मंगळवारी (दि.12 फेब्रुवारी) झालेल्या उद्‌घाटन समारंभास फाऊंडेशनचे संचालक डॉ. शाम अहिरराव, प्राचार्या डॉ. स्वाती भिसे, समन्वयक राजू शिंगोटे, विरेंद्र मेश्राम, प्रदिप बोरकर आदींसह सहभागी खेळाडू बहुसंख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत मुले व मुलींच्या क्रिकेट, हॉलीबॉल, थ्रोबॉल, बॅटमिंटन स्पर्धा होणार आहेत.

या स्पर्धेतील विजेत्या संघांना व खेळाडूंना 51 हजार रुपयांहून जास्त रोख सांघिक आणि वैयक्तिक बक्षिसे, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. बक्षिस वितरण समारंभ आकुर्डी, प्राधिकरण सेक्टर 27 येथील केरळ भवन येथे सोमवारी (दि. 18 फेब्रुवारी) दुपारी 1 वाजता ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, महाराष्ट्र हॉकी असोशिएशनच्या अध्यक्षा रेखा भिडे, छत्रपती पुरस्कार विजेते गोपाळ देवांग यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. प्रास्ताविक राजू शिंगोटे, स्वागत विरेंद्र मेश्राम आणि आभार प्रदिप बोरकर यानी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.