Pimpri : सावधान !, कोरोना रुग्णांचा मृत्यूदर वाढला; उच्चस्तरीय समिती नियुक्त

एमपीसी न्यूज – कोरोना बाधितांची संख्या मुंबई आणि पुणे येथे दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. तसेच कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत दिवसागणिक वाढणारे कोरोनाबाधित आणि रुग्णांच्या मृत्यूबाबत आता सरकारची चिंता वाढली आहे. मृत्यू दर कमी कसा करता, येईल यासाठी सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली आहे.

उच्चस्तरीय समितीद्वारे सरकारच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलपेक्षा आणखी काही जास्त केलं पाहिजे का ? तसेच मृतांमध्ये मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असे आजार असलेले रुग्ण जास्त आहेत. त्यामुळे यासर्व गोष्टींचा अभ्यास करून ही समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर पाच टक्क्यांपर्यंत पोहोचला असून मुंबईमध्ये सर्वाधिक 35 तर पुण्यामध्ये 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्र आत्तापर्यंत 52 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून ही धोक्याची घंटा आहे. लाॅकडाऊन असून देखील दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांची संख्या सरकार साठी चिंतेची बाब ठरत आहे.

दरम्यान आज (सोमवारी) 120 नवीन रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 868 वर जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त असून तो पाच टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत योग्य खबरदारी घेणे महत्त्वाचं आहे.

त्यामुळे लॉकडाऊन 15 एप्रिल पर्यंत शिथील होईल, असे गृहीत धरू नये व‌ शक्य झाल्यास लाॅकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवला जाऊ शकतो, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.