Pimpri: सवर्णांना दहा टक्के आरक्षण…हा तर मोदी सरकारचा चुनावी जुमला – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – आर्थिकदृष्ट्‌या मागास सवर्ण समाजाला आरक्षण म्हणजे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपचा पुन्हा एकदा मोठा चुनावी जुमला असल्याची टीका, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

भापकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  सन 2014 लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठमोठी आश्‍वासने दिली. साडेचार वर्षात ती आश्‍वासने पूर्ण केली नाहीत. साडेचार वर्षात सर्व स्तरावर सरकार अपयशी ठरल्यामुळे राम मंदिराचा पुन्हा बाहेर काढला.

मात्र, हा मुद्दा ऐरणीवर आणूनही पाच राज्यात भाजप तोंडावर आपटला. त्यामुळे आर्थिकदृष्ट्‌या मागास सवर्ण समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेसाठी हा भलामोठा ‘लॉलीपॉप’ असल्याचे भापकर यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.