BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : भारतरत्न जे. आर. डी. टाटा पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण

वल्लभ शेळके, दिलीप काकडे, डी.एस.राठोड, नेताजी पाटील, प्रमोद कुलकर्णी, मयूर साठे यांचा पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र औदयोगिक विकास परिषद पुणे आयोजित भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्र. चि. शेजवलकर तर, प्रमुख पाहुणे मनोहर पारळकर आणि सचिन लांडगे हे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य औदयोगिक विकास परिषद पुणेचे अध्यक्ष सुदाम भोरे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले आणि जयवंत भोसले, बाजीराव सातपुते , अरुण गराडे, राजेंद्र वाघ , हनुमंत देशमुख , सुरेश कंक , मानसी चिटणीस, संगीता झिंगूरके आदी उपस्थित होते.

यामध्ये उद्योग सारथी पुरस्कार वल्लभ शेळके, उद्योगरत्न पुरस्कार दिलीप काकडे, उद्योग विभूषण पुरस्कार डी.एस.राठोड, उद्योग भूषण पुरस्कार नेताजी पाटील, उद्योग मित्र पुरस्कार प्रमोद कुलकर्णी आणि युवा उदयोजक पुरस्कार मयूर साठे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना सुदाम मोरे यांनी केली. पुरस्कार प्रदान केल्यानंतर पुरस्कारार्थ्याशी मुलाखतीद्वारे पुरुषोत्तम सदाफुले यांनी हितगुज केली. प्रा. प्रचिन लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. मनोहर पारकर,संजय भेगडे,प्र. वि. शेजवलकर यांनी आपले विचार मांडले. जयवंत भोसले यांनी आभार मानले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3