Pimpri :  भारतीय राष्ट्रवादी पार्टीतर्फे चिंचवडमध्ये हिंगणघाट जळीत हत्याकांडाचा निषेध

एमपीसी न्यूज – हिंगणघाटमधील प्राध्यापिका जळीत हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी व आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील चोवीस वर्षीय प्राध्यापिकेला जिवंत जळून हत्या करण्यात आली. या घटनेने संबंध महाराष्ट्र हादरून निघाला आणि सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा निषेध करत चिंचवड येथे भारतीय राष्ट्रवादी पार्टी युवा मोर्चातर्फे मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला. आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे व आतापर्यंत झालेल्या अशा घटनांमधील सर्व आरोपींना योग्य शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निषेध मोर्चात भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष अजित संचेती, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजय भोईर, पुणे जिल्हा युवा सरचिटणीस राहुल अवसरमल, पिंपरी- चिंचवड युवा शहराध्यक्ष अक्षय घोडके, विधानसभा अध्यक्ष व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हिंगणघाट येथे घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून त्यातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी युवा प्रदेशाध्यक्ष अजित संचेती यांनी केली. संचेती म्हणाले की, आरोपींना वेळेत शिक्षा मिळत नसल्यामुळे अशा घटनांचे प्रमाण वाढत आहे अशा घटना थांबवायच्या असतील तर आरोपीना वेळेत शिक्षा देणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.