Pimpri: भवानी पेठेतील रुग्णाचा YCMH मध्ये मृत्यू, कोरोनाबाधित मृतांचा आकडा नऊ वर

Pimpri: Bhavani Peth patient dies in YCMH, corona death toll rises to nine

एमपीसी  न्यूज – पुण्यातील भवानी पेठेतील रहिवासी पण पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा आज (सोमवारी) कोरोनामुळे मृत्यू  झाला आहे. या पुरुष रुग्णाचे वय 57 होते. दरम्यान, आजपर्यंत पुण्यातील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पाच आणि शहरातील चार अशा नऊ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

भवानी पेठेतील रहिवासी असलेल्या या 57 वर्षीय रुग्णाला 8 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारही होते. उच्चरक्तदाबाचाही त्रास होता.

दरम्यान, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएमएचमध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि  24 एप्रिल रोजी  निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा, 6 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा आणि येरवडा येथील एका महिलेचा  वायसीएम रुग्णालयात,  भोसरीतील पुरुष रुग्णाचा 11 मे रोजी आणि आज पुण्यातील वायसीएमएचमध्ये उपचार घेत असलेल्या पुरुष रुग्णाता अशा नऊ जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.