Pimpri: ‘भीमसृष्टी’चे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारलेल्या भीमसृष्टीच्या उद्घाटनाच्या दिवस निश्चित झाला आहे. केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्या (शनिवारी) सकाळी दहा वाजता भीमसृष्टीचे उद्घाटन होणार आहे. याबाबतची माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली.

भीमसृष्टी काम संथ गतीने होत असल्याने महापालिका प्रशासनावर जोरदार टीका होत होती. शहरातील सामाजिक संघटना आणि संस्थानी दोषी अधिका-यांवर कडक कारवाईची मागणी लावून धरली आहे. अखेर, महापालिका प्रशासनाने काम मार्गी लावल्याचा दावा करत उद्घाटनाचा कार्यक्रम निश्चित केला आहे.

…अशी आहे भीमसृष्टी 

भीमसृष्टीमध्ये 19 म्युरल्स बसविण्यात येणार आहेत. यामध्ये माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना 26 नोव्हेंबर 1946 रोजी राज्यघटना सुपूर्द करताना, नागपूर येथील दीक्षाभूमी येथे केलेले भाषण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कुटुंबियांसमवेत असलेला फोटो, प्रबुद्ध भारत मुकनायाकाचे लायब्ररीत टेबलावर लिखाण करताना, मानगाव परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांचा नेता घोषित करताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज अशा वेगवेगळ्या घटनांचे म्युरल्स येथे असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.