Pimpri: …अशी आहे भीमसृष्टी ! भीमसृष्टीचे 10 सप्टेंबरला लोकार्पण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येणा-या भीमसृष्टीचे काम अंतिम टप्प्यात आहे. 10 सप्टेंबर रोजी भीमसृष्टीचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यानात भीमसृष्टी साकारली जात आहे. भीमसृष्टीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर बाबासाहेब यांच्या पुतळ्याशेजारी माता रमाई भिमराव आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणार येणार आहे. स्मारक केले जाणार आहे. या स्मारकाचे भूमीपूजन आणि भीमसृष्टीचे उद्घाटन 10 सप्टेंबर रोजी केले जाणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

…अशी आहे भीमसृष्टी

भीमसृष्टीमध्ये 19 म्युरल्स बसविण्यात येणार आहेत. यामध्ये माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना 26 नोव्हेंबर 1946 रोजी राज्यघटना सुपूर्द करताना, नागपूर येथील दीक्षाभूमी येथे केलेले भाषण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कुटुंबियांसमवेत असलेला फोटो, प्रबुद्ध भारत मुकनायकाचे लायब्ररीत टेबलावर लिखाण करताना, मानगाव परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांचा नेता घोषित करताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज अशा वेगवेगळ्या घटनांचे म्युरल्स येथे असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.