Pimpri : भूगोल फाउंडेशनतर्फे हडसर किल्ला संवर्धन, पर्यावरण जनजागरण व प्लास्टिक मुक्त अभियान

एमपीसी न्यूज- भूगोल फाउंडेशन संस्थेच्या वतीने नुकतेच किल्ले हडसर येथे दुर्गभ्रमण तसेच प्लॅस्टिक व कचरा मुक्त हडसर किल्ला परिसर याविषयी जनजागृती व प्रबोधन मोहीम राबविण्यात आली. यामध्ये स्थानिक नागरिक, जुन्नर वनविभाग व समाजसेवी संस्थाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

भूगोल फाउंडेेशनतर्फे हडसर गावामध्ये वनविभागाच्या साथीने पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी पत्रके वाटण्यात आली व स्थानिक लोकांना मोहिमेत सहभागी करुन घेत जनप्रबोधन करण्यात आले.

त्यानंतर मोहिमेच्या सुरूवातीला सर्वात महत्त्वाचे म्हणजे किल्ल्यावरिल भुयारी मार्ग व पाण्याची टाकी यांची साफसफाई वनविभाग जुन्नर व वनरक्षक रमेश खरमाळे यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण करण्यात आली. आता या भुयारातील मोकळ्या झालेल्या टाकीत पाणी साठुन पर्यटकांना पिण्यासाठी ते उपलब्ध होईल. गडाच्या पायथ्याशी व गडावर स्वच्छता करण्यात आली.

गडाच्या पायथ्याशी हडसर येथे गडाचा इतिहास व पर्यावरण वाचवा याविषयी मार्गदर्शन व आवाहन करणारा कायमस्वरूपी फलक लावण्यात आला, त्याची नवनिर्वाचित सरपंच सखाराम भले, उपसरंपच जया सांगडे, ग्रामपंचायत सदस्या शीला सांगडे, मोरया मित्र मंडळ अध्यक्ष प्रदीप शिंदे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. याप्रसंगी सर्वच ग्रामस्थ उपस्थितीत होते. यावेळी सर्वांना गडसंवर्धन, स्वच्छता, प्रदूषण, पर्यावरण, वृक्षसंवर्धन याविषयी भूगोल फाउंडेशनचे मार्गदर्शक विठ्ठल वाळुंज यांनी प्रबोधन केले.

अष्टविनायकापैकी एक श्रीक्षेत्र ओझर येथेही पर्यावरण, प्रदूषण, स्वच्छता, वृक्षसंवर्धन याविषयी पत्रके वाटत व पर्यावरण संतुलन विषयावर फलक हातात घेऊन जनजागरण रॅली काढण्यात आली. यावेळी संस्थान अध्यक्ष व इतर सदस्य सहभागी झाले होते. संस्थानाचे अध्यक्ष मांडे व कवडे यांनी सर्वांना मार्गदर्शन करुन सर्वांचा सन्मान केला.

या मोहिमेमध्ये जुन्नर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे याचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच प्रत्यक्ष मोहिमेत वनरक्षक शिवनेरी भूषण रमेश खरमाळे व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. भूगोल फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल (नाना) वाळूंज, निकुंज रेंगे, सुनील काटकर, बाळासाहेब गरुड, गणेश चौधरी, चव्हाण सुहास, झारखंडे राय, रोहन वाळुंज, अमित राय, अविनाश खोसे, राजेश मोहन्तो व त्यांचे सहकारी असे सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. संतनगर मित्र मंडळ व इंद्रायणी सेवा संघाचे साहेबराव गावडे, कर्नल तानाजी अरबुज, अनिल घाडगे, शशिकांत वाडते, हभप सतीश महाराज वाळुंज, गोरक्ष आदक, बंडु येरावार, विशाल शेवाळे, सुरेश येरावार, चंद्रकांत थोरात, सुनील मदने, पंकज कुंभार व त्यांचे इतर सहकारी, आझाद मित्र मंडळ अतुल नढे व शिवानंद ठाकर व इतर सहकारी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.