Pimpri : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सायकल हा उत्तम पर्याय – अमित गोरखे

पिंपरी विधानसभा क्षेत्रातील सायकल प्रेमी नागरिकांना 447 सायकलींचे माफक दरात वाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर हे सायकलचे शहर म्हणून ओळखलं ( Pimpri ) जात होते. त्यानंतर काळ बदलत गेला, मोटार सायकल आल्या तसा तसा पर्यावरणाचा ही समतोल ही बिघडत गेला.आज पुन्हा आपल्याला पर्यावरणाचा समतोल तसेच आपले आरोग्य(फिटनेस)ही सांभाळता येईल यासाठी आपण पुन्हा एकदा सायकल हा पर्याय निवडावा, असे आवाहन अमित गोरखे यांनी  केले.

पिंपरी विधानसभा क्षेत्रातील सायकल प्रेमी नागरिकांना 447 अमित गोरखे यांच्या विशेष प्रयत्नातून अत्यंत  माफक दरात सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. शहरात सायकलचे प्रमाण वाढावे यासाठी सामाजिक उपक्रमाच्या हेतूने अमित गोरख यांनी हा पुढाकार घेऊन ही संकल्पना राबवली. यावेळी माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की सायकल ही पुन्हा काळाची गरज बनत चालले आहे. सायकल ही पर्यावरण आणि शारिरीक आरोग्यासाठी सुद्धा महत्वाची आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांसाठी महत्वाची आहे.

Akurdi : सुखाचा दागिना घालून आपल्यासह समाज सुखी करा – ह. भ. प. किसनमहाराज चौधरी

या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कैलास कुटे,गणेश लंगोटे,नंदू भोगले,सूर्यकांत मोहिते,तसेच संभाजी नगर चिंचवड मधिल महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघातील   बबन दत्तात्रय वाडेकर, रामदास जाधव, सोपान साबळे बाबासाहेब शिंदे यशवंत ठाकूर विलास पवार महादेव भडांगे कैलास तापकीर आदी सर्व ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित ( Pimpri ) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.