Pimpri : रस्ते सुरक्षा जनजागृतीच्या निमित्ताने टाटा मोटर्सतर्फे सायकल रॅली

एमपीसी न्यूज- रस्ते सुरक्षा जनजागृती वर्षाच्या निमित्ताने टाटा मोटर्स पिंपरीच्या वतीने आज, रविवारी सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टाटा मोटर्सच्या मुख्य प्रवेशद्वारातून सकाळी साडेसात वाजता या रॅलीला झेंडा दाखवल्यानंतर ही रॅली नेहरूनगर, डॉ. आंबेडकर पुतळा चौक, पिंपरी स्टेशन उड्डाणपूल, चिंचवड लिंक रस्ता, चापेकर चौक,एसकेएफ कंपनी, टाटा मोटर्स चिंचवड, जुना पुणे मुंबई महामार्ग, राका गॅस एजन्सी, केएसबी चौक ते परत टाटा मोटर्स अशी रॅली काढण्यात आली.  पिवळ्या रंगाचा टीशर्ट परिधान केलेले आणि सायकलवर रस्ता सुरक्षा संबंधित फलक लावून निघालेले सायकलस्वार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.