Pimpri : मतदार जनजागृतीसाठी उद्या पिंपरीत सायकल रॅली

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघात उद्या (रविवारी) सकाळी साडेसहा वाजता सायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत सायकलस्वार, सायकलप्रेमी संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी संदीप खोत यांनी केले आहे.

लोकसभा, विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होती. मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी, लोकशाही समृद्ध व बळकट करण्याकरिता निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. पथनाट्याद्वारे जनजागृती केली जात आहे. त्याअंतर्गत उद्या (रविवारी)पिंपरी विधानसभा मतदारसंघात सायकल रॅली काढण्यात येणार आहे.

सायकल रॅलीचा मार्ग

सकाळी साडेसहा वाजता आकुर्डीतील डॉ. हेडगेवार भवनापासून रॅलीला सुरुवात होणार आहे. संभाजी चौक, भक्ती-शक्ती, पिंपरी महापालिका भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शगुन चौक, साई चौक, गणेश हॉटेल तपोवन मंदिर, डीलक्स चौक, रीव्हर रोड, भाटनगर, लिंकरोड, चापेकर चौक, वाल्हेकरवाडी स्पाईन रोड, संभाजी चौक मार्गे डॉ. हेडगेवार भवन येथे रॅलीची सांगता होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.