Pimpri : पहाटेच्या वेळी दुचाकीस्वारास लुटले; दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दोन चोरट्यांनी मिळून एका दुचाकीस्वाराला लुटले. हा प्रकार शुक्रवारी (दि.13) पहाटे तीनच्या सुमारास चिंचवड येथील ग्रेडसेपरेटर रोडवर घडला.

रियाझ रझ्झाक कुरेशी (वय 46 रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रियाझ शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास चिंचवड मधील अण्णासाहेब मगर नगर येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावर ग्रेड सेपरेटरवर रस्त्याच्या बाजूला थांबले होते.

यावेळी मोपेड दुचाकीवरून दोन चोरटे आले. ‘इथं का थांबला रे?’ असे म्हणत चोरट्यांनी रियाझ यांच्यासोबत झटापटी करून त्यांचा मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण 25 हजार रुपयांचा एवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.