Pimpri : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्याबद्दल पिंपरीत भाजयुमो तर्फे आनंदोत्सव साजरा

एमपीसी न्यूज – जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्या बद्दल पिंपरी येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शहराध्यक्ष तथा नगरसेवक रवि लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमोतर्फे पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, भारतीय जनता पक्षाचा विजय असो’, ‘मोदीजी तुम आगे बढो’ आश्या घोषणांनी परिसरात एकाच जल्लोष केला.

जम्मु-काश्मीरमध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी कलम 370 चा विरोध केला होता, ‘एक देश में दो विधान एक देश में दो निशान और एक देश में दो प्रधान नही चलेंगे’ आसा नारा दिला होता. मोदी सरकारने आज सात दशकानंतर हि मागणी पुर्ण करुन श्यामा प्रसाद मुखर्जी यांना ख-या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली आहे, असे रवि लांडगे यांनी सांगितले.

  • महेश कुलकर्णी म्हणाले, कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबाद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि “पोलादी” गृहमंत्री अमित शहा यांचे हार्दीक अभिनंदन करुन आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी भाजयुमो शहराध्यक्ष रवि लांडगे, प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश कुलकर्णी, मंडलाध्यक्ष अजय पातडे, प्रभाग समिती स्विकृत सदस्य वैशाली खाडये, भाजयुमोचे अजित कुलथे, दिपक नागरगोजे, युवराज लांडे, धनंजय शाळिग्राम, सचिन बंदी, राहुल मोकाशी, योगेश सोनावणे, भुषण पाटील, सचिन शिवले, संतोष तापकीर, गणेश संभेराव, प्रसाद खेडकर, ऋतिक चव्हाण, अमित देशमुख, अमोल कुलथे, नागनाथ गुट्टे, दिपक शर्मा, प्रकाश चौधरी, परमेश्वर माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.