Pimpri : भरदिवसा घरासमोर पार्क केलेली दुचाकी पेटवली

एमपीसी न्यूज – घरासमोर पार्क केलेली दुचाकी एका तरुणाने पेटवली. ही घटना 15 जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास विठ्ठल नगर पिंपरी येथे घडली.

राजू मुकिंदा होके (वय 31, रा. विठ्ठल नगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरेश घोडके (वय 25, रा. विठ्ठल नगर पिंपरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू यांनी त्यांची होंडा कंपनीचे शाईन दुचाकी (एम एच 14 / जी जी 9375) घरासमोर पार्क केली होती. आरोपीने राजू यांची दुचाकी भरदिवसा पेटवून दिली. दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. दुचाकी जळाल्याने राजू यांचे 79 हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत त्यांनी गुन्हा नोंदवला. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.