Pimpri : शहरात सायकल चोरीचा एक तर वाहन चोरीचे तीन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली महागडी सायकल चोरून नेली. तसेच रस्त्यावर आणि घरासमोर उभ्या केल्या तीन दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी मंगळवारी (दि. 24) चिंचवड, निगडी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहन चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत.

श्रेयस व्ही. जैन (वय 21, रा. गुरूदत्त कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी त्यांची 21 गिअर आणि डीस्कब्रेक असलेली 12 हजार रुपयांची सायकल बिल्डींगच्या पार्किंमध्ये हॅन्डल लॉक करून उभी केली होती. 8 ऑगस्ट रोजी चोरट्यांनी ती चोरून नेली. जैन यांनी मंगळवारी (दि. 24) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

संतोष मुरलीधर सुतार (वय 40, रा. पेठ क्रमांक 24, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते रात्री साडेदहा वाजताच्या दरम्यान घडली. सुतार यांनी एमएच 14 / जी डब्ल्यू 2062 ही 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी निगडीतील इन्पीरिया मॉल येथील पार्किंगमध्ये उभी केली होती. त्यावेळी चोरट्यांनी ती चोरून नेली.

आकाश बाळू पालखे (वय 27, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबर दुपारी एक ते 18 सप्टेंबर सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान पालखे यांनी एम एच 14 / एफ एफ 0328 ही 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी रस्त्यावरील सलूनसमोर पार्क केली. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.

रियासत गुलाब शेख (वय 27, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री शेख यांनी आपली दुचाकी सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.

शहरात वाहन चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.