Pimpri : पिंपरी, निगडी, हिंजवडी मधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी, निगडी आणि हिंजवडी परिसरातून तीन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी गुरुवारी (दि. 26) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश भीमराव भुजंग (वय 22, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश यांनी त्यांची 15 हजार रुपयांची एम एच 21 / बी एम 4178 ही दुचाकी संत तुकाराम नगर येथे 22 सप्टेंबर रोजी रात्री पार्क केली. 23 सप्टेंबर रोजी सकाळी दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

अक्षय मणिराम वर्मा (वय 28, रा. गोखलेनगर, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय यांनी त्यांची 15 हजार रुपयांची एम एच 14 / डी पी 4515 ही दुचाकी प्राधिकरण निगडी येथील हॉटेल मल्हार समोर 24 सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास पार्क केली. दुचाकी पार्क करताना तिचा हॅण्डल लॉक केला. दिवसभराच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

दिलीप सोपान कलाटे (वय 57, रा. बाणेर, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप यांनी 24 सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास त्यांची एम एच 12 / एल क्यू 1312 ही दुचाकी राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. 25 सप्टेंबर रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.