BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : दुचाकी चोरीचे सत्र सुरूच ! भोसरी व पिंपरी येथून दुचाकी चोरीस 

0

एमपीसी न्यूज- शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून बुधवारी (दि. 9) पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. ही घटना भोसरी येथे घडली. दुसऱ्या घटनेत रहदारी असलेल्या रस्त्यावरून दुचाकी चोरून नेली. ही घटना पिंपरी चौकात घडली. 

राजेश दिनकर थोरात (वय 32, रा. उत्तमनगर, खडकवासला, पुणे) यांनी बुधवारी (दि. 9) भोसरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास थोरात यांनी (एमएच-12-एफआर-3319) ही 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी भोसरीतील देसाई हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. चोरट्याने ती चोरून नेली. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलीस नाईक नागरे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत सतत रहदारी असलेल्या रस्त्यावरून भरदिवसा चोरट्याने दुचाकी चोरून नेली. ही घटना पिंपरी चौक येथे घडली.

लक्ष्मीपतीराव सूर्याराव वड्डादी (वय 69, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी बुधवारी (दि. 9) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपतीराव यांनी 4 ऑक्‍टोबर रोजी सकाळी आठ वाजता (एमएच-14-एए-871) ही दुचाकी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील बाजूस उभी केली होती. सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान त्यांना आपली दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. पोलीस हवालदार पाटील याबाबत अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3