Pimpri: लक्ष्मणभाऊ, महेशदादांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा निर्धार

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे शहराध्यक्ष उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ‘कमळ’ चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला सुरूवात करावी, असे आवाहन जगताप आणि लांडगे यांनी केले.

आमदार जगताप आणि लांडगे या दोघांनी आज (बुधवारी) पिंपरी, मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

यावेळी खासदार अमर साबळे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपाध्यक्ष हेमंत तापकीर, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पक्षाचे प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, उमा खापरे, राजेश पिल्ले, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर प्रवक्ते व सरचिटणीस अमोल थोरात, बाबू नायर, भाजयुमोचे शहराध्यक्ष व नगरसेवक रवि लांडगे, माजी महापौर आर. एस. कुमार, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, प्रकाश जवळकर, विजय फुगे आदी उपस्थित होते.

आमदार जगताप, लांडगे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते प्रचाराच्या नियोजनाबाबत सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत जगताप आणि लांडगे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

पक्ष कार्यकर्त्यांनी ‘कमळ’ चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी जोमाने कामाला सुरूवात करावी, असे आवाहन जगताप आणि लांडगे यांनी केले.

दरम्यान, बैठकीपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आमदार जगताप आणि आमदार लांडगे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्याचप्रमाणे श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाल उपाध्याय व भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.