Pimpri : ‘हिंगणघाटमधील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी’ ; भाजपचे आंदोलन

एमपीसी न्यूज – हिंगणघाट मधील पीडित प्राध्यपिकेच्या मृत्युस जबाबदार असणा-या क्रुर, निर्दयी प्रवृत्तीचा पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. या जळीतकांडातील आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

मोरवाडीतील पक्ष कार्यालयासमोर आज (मंगळवारी) आंदोलन झाले. शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महापौर उषा ढोरे, भाजपच्या प्रदेश नेत्या उमा खापरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, पीसीएनटीडीएचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक राजेंद्र लांडगे, तुषार कामठे, महिला शहराध्यक्षा शैला मोळक, नगरसेविका प्रियांका बारसे, वीणा सोनवलकर, आशा काळे, अमोल थोरात, राजु दुर्गे आदी सहभागी झाले होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “हिंगणघाटमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यातील देशातील महिला सुरक्षित नाहीत. महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. क्रुर कृत्य करणा-या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. त्यामुळे अशा व्यक्ती तयार होणार नाहीत. त्याला आळा बसेल. पीडित मुलीच्या कुटुबियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत”

‘झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलकांनी हातावर काळी फित बांधली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.