Pimpri : भाजपचा वर्धापनदिन साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या पक्ष कार्यालयात भाजपचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी शामाप्रसाद मुखर्जी, पं. दिनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.

दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिवसेना, रिपाई, शिवसंग्राम युतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आज वर्धापन दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजप कार्यालयात सदिच्छा भेट दिली.

यावेळी भाजप पक्ष कार्यालयातील उपस्थित असलेले स्विकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस प्रमोद निसळ, उपाध्यक्ष रामकृष्ण राणे, नंदू भोगले, विजय शिनकर, कार्यालयीन प्रमुख संजय परळीकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, रेल्वे समाज समितीचे बशिर सुतार, संभाजी बारणे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.