Pimpri: भाजप नगरसेवकाचे ‘ग’ प्रभागात कचरा फेको आंदोलन; क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे निष्क्रिय!

नगरसेवक संदीप वाघेरे यांचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी गावात कचरा समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संतप्त झालेले सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी ‘ग’ प्रभागाच्या आवारात कचरा फेको आंदोलन केले. क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे या निष्क्रिय अधिकारी आहेत. त्यांना कामकाज व्यवस्थितपणे हाताळता येत नाही. आजपर्यंत त्यांना प्रभागातील कोणतीही समक्षा सक्षमपणे हाताळता आली नाही. सातत्याने आरोग्य विषयक समस्याचा पाठपुरावा करुनही झगडे यांना मुख्यालयातून प्रभागातील समस्या पाहण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यांचे प्रभागाकडे लक्ष नसल्याचा आरोपही वाघेरे यांनी केला.

शहरातील कचरा उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडे मोठी यंत्रणा आहे. परंतु, एवढी मोठी यंत्रणा असतानाही कामकाज व्यवस्थितरित्या होत नाही. ठेकेदारी पद्धतीने सुरु असलेले काम हे फक्त ठेकेदार पोसण्यासाठी काढण्यात आलेले आहे काय? अशी शंका येत असून प्रभागातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झालेली आहे. धूर फवारणीची वाहने 15-15 दिवस प्रभागामध्ये येत नाहीत. आल्या तर मशीन व्यवस्थितरित्या चालत नाहीत. किरकोळ स्वरुपाचा दंड आकारुन ठेकेदारांना बगल देण्यात येत आहे.

  • पावसाळा सुरु होत असल्याने शहरामध्ये डेंग्यू सारखा आजार फैलावण्याची भिती बळावली आहे. त्यावर आरोग्य विभागामार्फत कोणत्याही उपाययोजना सुरु केल्याचे दिसून येत नाही. पिंपरी गावात कचरा समस्या दिवसें-दिवस वाढत चालली आहे. क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे यांना कामकाज व्यवस्थितपणे हाताळता येत नाही.

आजपर्यंत त्यांना प्रभागातील कोणतीही समक्षा सक्षमपणे हाताळता आली नाही. सातत्याने आरोग्य विषयक समस्याचा पाठपुरावा करुनही झगडे यांना मुख्यालयातून प्रभागातील समस्या पाहण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यांचे प्रभागाकडे लक्ष नसल्याचा आरोपही वाघेरे यांनी केला. आता प्रभागात कचरा टाकल्यानंतरी प्रशासनाला जाई येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.