Pimpri: भाजप नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’ला

एमपीसी न्यूज – कोरोना विरोधातील लढाईसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप, संलग्न अशा 85 नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला (पीएमएनआरएफ) दिले आहे. त्याची रक्कम एक कोटी 27 लाख 5  हजार रुपये होत आहे.  दरम्यान, राष्ट्रवादीच्या 38 नगरसेवकांनी यापूर्वीच मुख्यमंत्री सहायता निधीला मानधन दिले आहे.

_MPC_DIR_MPU_II

सभागृह नेते नामदेव ढाके यांनी याबाबतची माहिती दिली. सद्यस्थितीत जगभर कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचा  भारतातही परिणाम होताना दिसत आहे. या कोरोनामुळे भारतामध्ये काही प्रमाणात जीवितहानी देखील झालेली आहे. तसेच देशातील बऱ्याच नागरिकांची यामुळे उपासमार देखील होत आहे. या परिस्थितीतून देशातील नागरिकांना सावरण्यासाठी भाजपाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका यांचे एक महिन्याचे मानधन देणार आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला (पीएमएनआरएफ) मानधनाचा धनादेश देण्याबाबत आयुक्तांना सूचना केली आहे.

त्याचप्रमाणे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी देखील त्यांचे एक महिन्यांचे मानधन ‘भाजपा आपदा कोष’ला दिले असल्याचे ढाके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.