BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: भाजपने सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी दिला 51 लाख रुपयांचा निधी

एमपीसी न्यूज – सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीसाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने 51 लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.

कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विषयाच्या व प्रलंबित प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील नुकेतच शहरात आले होते. शहर भाजपने पूरग्रस्तांसाठी 51 लाख रुपयांचा निधी त्यांच्याकडे दिला आहे.

HB_POST_END_FTR-A2

.