Pimpri : महापालिकेला अण्णासाहेब मगर यांचा विसर

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार कै. आण्णासाहेब मगर यांचा महापालिकेला आणि सत्ताधारी भाजपला विसर पडला आहे. आण्णासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला नाही. मुख्यालयातील आण्णासाहेबांच्या पुतळ्याची स्वच्छता केली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला. ज्यांच्या दूरदृष्टीमुळे हे शहर उदयास आले. त्यांच्यामुळे तुम्ही महापालिकेत विविध पदे भोगत आहात. त्यांनाच तुम्ही विसरले. ही बाब भाजपासारख्या शिस्तबध्द व संस्कृतीचे रक्षक म्हणविणा-या पक्षासाठी लांछनास्पद आहे, असेही ते म्हणाले.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका पिंपरी, चिंचवड,भोसरी व आकुर्डी ही चार गावे एकत्र करुन कै. आण्णासाहेब मगर यांनी नगरपालिका स्थापन करुन या शहराची मुर्हूतमेढ रोवली. त्यानंतर सन 1982 रोजी महापालिकेची स्थापना केली. महापालिका झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विविध उद्योग आले. त्यामुळे शहराचा विकास इपाट्याने झाला. आज या शहराची ओळख सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून देशात ओळखले जाते. हे सर्व झाले कै. आण्णासाहेब मगर यांनी दूरदृष्टीने विचार करुन नगरपालिका स्थापन केल्यामुळे व त्यानंतर महापालिका झाल्यामुळे शक्य झाले.

कै. आण्णासाहेब मगर यांची शुक्रवारी (दि. 26)100 वी जयंती होती. जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला नाही. आण्णासाहेब मगर यांनी या शहराची मूहूर्तमेढ रोवली. त्यांचीच 100 वी जयंती सत्ताधारी भाजप व प्रशासन कसे काय विसरले ? कै. आण्णासाहेब मगरांची 100 व्या जयंती निमित्ताने विविध सामाजिक, प्रबोधनात्मक चार पाच दिवस कार्यक्रम ठेवले अपेक्षित होते. परंतु, सत्ताधारी भाजप व प्रशासनाने साधा मुख्यालयातील आण्णासाहेबांच्या पुतळ्याची स्वच्छता केली नाही की साधा हार घातला नसल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजप व प्रशासनाचा साने यांनी निषेध केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.