Pimpri : भाजप सरकार कोसळले; शिवसैनिकांचा फटाके फोडून, पेढे वाटून पिंपरीत जल्लोष

एमपीसी न्यूज – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देताच शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने फटाके फोडून, पेढे वाटून आणि  फुगडी खेळून आंनदोत्सव साजरा केला. ‘जय भवानी, जय शिवाजी’,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, ‘संविधानाचा विजय असो’ अशा जोरदार घोषणा शिवसैनिकांनी यावेळी दिल्या.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजप सरकार अल्पमतात आल्याने भाजपचे सरकार कोसळले. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजप सरकार कोसळताच शिवसेनेच्या नेत्यांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळल्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर चौकात जल्लोष साजरा केला.

माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे,  भोसरी, खेडचे सहसंपर्कप्रमुख, कामगार नेते इरफान सय्यद, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, पिंपरी महिला आघाडीच्या संघटिका सरिता साने, चिंचवड महिला आघाडीच्या संघटिका अनिता तुतारे,  मधुकर बाबर, नाना काळभोर, राजेश वाबळे आदी शिवसैनिक जल्लोषात सहभागी झाले होते. महिलांनी फुगडी खेळून आंनदोत्सव साजरा केला.

‘जय भवानी, जय शिवाजी’,  ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’, ‘संविधानाचा विजय असो’, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला’, अशा जोरदार घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणानून सोडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.