Pimpri : पिंपरी-चिंचवड भोसरी मतदारसंघ भाजपा लिगल सेल पदाधिकाऱ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा लिगल सेल अध्यक्षांची नुकतीच निवड करण्यात आली. पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड सुनील कडुस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यामध्ये पिंपरी मंडल अध्यक्ष हरीश दौलत भोसुरे, भोसरी विधानसभा मंडल अध्यक्ष संजय नागरगोजे, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष देवदास शिंदे, उपाध्यक्ष रघुनाथ सोनवणे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष तुकाराम पडवळे, सचिव प्रकाश कालेकर, सी. एम. माने, सांगवी मंडळ अध्यक्ष गणेश गवारे, अंतरा देशपांडे, किवळे मंडळ अध्यक्ष कांता गोर्डे यांची निवड झाली.

_MPC_DIR_MPU_II

भारतीय जनता पार्टी लिगल सेलच्या मंडळ अध्यक्षपदी निवड झालेल्या सभासदांचा पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोशिएशनच्या वतीने अॅड सुनील कडुस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पूनम राऊत, रामचंद्र बोराटे, महेश टेमगीरे, योगेश थांबा, अनिरुध्द गायकवाड आदि उपस्थित होते

याप्रसंगी अतिश लांडगे, संजय दातीर पाटील, अनिल डांगे, थांबा यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी बोलताना सुनील कडुस्कर म्हणाले, “कोणत्याही पक्षाचा लीगल सेल असो, आपण सर्वानी एकत्र येऊन आपल्या न्यायालयाच्या प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे” देवदास शिंदे म्हणाले, “आपण सर्व वकील बंधू – भगिनी एकच आहोत. न्यायालयाचा प्रलंबित विषय असो व वकिलांच्या कोणत्याही अडीअडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केला जाईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.