BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: महापालिका आयु्क्त कार्यालयावर ‘भाजप प्रवक्ते, भाजप पक्ष कार्यालयाची पाटी’!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनोखे आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप कार्यालयात जाऊन शिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज (बुधवारी) आयुक्तांच्या कार्यालयावर भाजपचे निवडणूक चिन्ह ‘कमळा’सह भाजप पक्ष कार्यालय, श्रावण हर्डीकर प्रवक्ते भाजप’ असे फलक लावले आहेत. आयुक्त कार्यालय भाजपचे झाल्याच्या घोषणा यावेळी नगरसेवकांनी दिल्या.

भाजपचे घरगडी, दलाल, प्रवक्ते अशी टीका होत असतानाच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी (दि. 25) थेट भाजपच्या पक्ष कार्यालयात हजेरी लावली. शिष्टाचार संकेत बाजूला करत भाजप कार्यालयात जाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बंद दाराआड ‘गुफ्तगू’ केले.

  • सनदी अधिका-याने सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात जाण्याची महापालिका इतिहासातील पहिलीच घटना अडली आहे. आयुक्त हर्डीकर भाजपचे हस्तक असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील आयुक्तांच्या कार्यालयावर भाजप पक्ष कार्यालय, श्रावण हर्डीकर प्रवक्ते भाजप’ असे फलक लावले आहेत.

  • या आंदोलनात नगरसेवक मयूर कलाटे, राहुल भोसले, विनोद नढे, जावेद शेख, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, राजू बनसोडे, नगरसेविका प्रज्ञा खानोलकर सहभागी झाले होते.

Advertisement