Pimpri : विधानसभेला ‘अबकी बार 220 पार’, भाजपचा नारा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना 228 विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला 288 जागांपैकी 220 जागा जिंकण्याचे युतीचे उद्दिष्ट आहे. आगामी महिन्याभरात राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथी होणार आहेत. त्यामुळे युतीला 220 जागा जिंकणे अशक्य नाही असा विश्वास महसूलमंत्री, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर पाटील यांनी आज (मंगळवारी) पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या मोरवाडीतील कार्यालयाला भेट दिली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यात लागू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, पीसीएनटीडीचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे, भाजप प्रदेश नेत्या उमा खापरे, महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.