Pimpri: मध्यावधी निवडणुका झाल्यास ‘भाजप’लाच जनादेश – अमर साबळे

एमपीसी न्यूज – राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश दिलेला असतानाही शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात अस्थितरता निर्माण झाली आहे. राज्यात अजुनही महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वास वाटत आहे. मात्र, ‘भाजप’ने मध्यावधी निवडणुकांची तयारी सुरू केली असून मध्यावधी निवडणुका झाल्यास राज्यातील जनता भाजपलाच पुन्हा जनादेश देईल, असा विश्वास भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला.

पिंपरीत पत्रकार परिषदेत आज (मंगळवारी) बोलताना साबळे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत सरकारने नेत्रदिपक कामगीरी करण्यात यश आले. त्यामुळेच जनतेने महायुतीला पुन्हा एकदा बहुमत दिले. मात्र शिवसेनेने अचानकपणे वेगळी भूमिका घेतली.

राज्याची वाटचाल अस्थिरतेकडे सुरू असून राष्ट्रपतील राजवट लागू झाल्यास काही महिन्यांत पुन्हा मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाने मध्यावधीचीही तयारी सुरू केली असून मध्यावधी निवडणुका झाल्यास भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळेल, असा विश्वासही साबळे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.