Pimpri: भाजयुमोचे कोरोना योद्ध्यांसोबत रक्षाबंधन; आयुक्तांनाही पाठविली राखी

भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना ही राखी बांधण्यात आली. : BJP's Rakshabandhan with Corona Warriors; ; Rakhi also sent to the Commissioner

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आले. तसेच पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पोस्टाने राखी पाठवण्यात आली आहे.

कोविड योद्धांनी या महामारीच्या संकट काळात जे योगदान व सेवा केली आहे ती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्या अनुषंगाने रक्षाबंधना निमित्त पिंपरी-चिंचवड परिसरातील वायसीएम येथील कोरोना योद्धा, सुरक्षारक्षक आणि पोलिस कर्मचारी यांना राखी बांधून त्यांचे आभार मानण्यात आले.

तत्पूर्वी भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना ही राखी बांधण्यात आली.

याप्रसंगी भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात, भाजयुमो अध्यक्ष संकेत चोंधे, स्विकृत सदस्य दिनेश यादव, भाजयुमोचे सुमित घाटे, तेजस्विनी कदम, उदय गायकवाड, शिवराज लांडगे, प्रकाश चौधरी, विक्रांत गंगावणे, सुप्रीम चोंधे, प्रियांका घाडगे, सारिका माळी, रोहिणी डुंबरे, धनश्री जुवेकर, सायली शहाणे, मुक्ता गोसावी, अंजली पांडे, पूजा आल्हाट, स्वाती गंगावणे, पूजा राजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.