Pimpri : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघातर्फे वस्ती शाळेतील मुलांना ब्लॅंकेटचे वाटप

एमपीसी न्युज – जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित वस्ती शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ, पुणे जिल्हा तर्फे ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष राम जाधव, वस्ती शाळेच्या संचालिका अदिती निकम, राहुल गाडेकर, रमेश लादे, अजय खरात, पंकज ओव्हाळ, निलेश शेवाळे, सुमीत कुवर, गणेश कांबळे, रमेश लादे, सुनिल सावंत, सुमीत लौहरे आदी उपस्थित होते.

यावेळी राम जाधव म्हणाले, आज समाजात अनेक घटक असे आहेत, की त्यांना आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. स्थलांतरित, अपंग, स्त्रिया, मूलं, स्थानिक, अल्पसंख्याक आणि भेदभाव यांचा धोका असलेल्या व्यक्तींना आपल्या हक्कांचे रक्षण करून जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.

अदिती निकम यांनी सांगितले, की सर्व मानवी हक्क हे अविभाज्य आहेत. मग ते जगण्याचा अधिकार, समता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे अधिकार; तसेच कामाचा अधिकार, सामाजिक सुरक्षा, शिक्षणाचा अधिकार असो. प्रत्येकाने आपले मूलभूत अधिकार जाणून घेत असंघटित क्षेत्रातील लोकांनी एकत्रित होऊन न्याय मिळण्यासाठी दबाव आणणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार आदिती निकम यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.