BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : ‘जॅझ अप सलून’च्या वतीने अंध; अपंग आणि शेतकर्‍यांच्या मुलींना मोफत सेवा

0

एमपीसी न्यूज – सध्या लग्नसराईचे दिवस चालू आहेत. लग्न समारंभात महिला आणि पुरुष सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण विविध सलून, ब्युटी पार्लरचा वापर करित असतात. परंतु आपल्या पिंपरी-चिचवड, पुणे शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातील म्हणजेच चिखली, देहू, आळंदी, खेडशिवापूर, कात्रज, हिंजवडी गावठाण आदी भागातील लोकांना सलून, ब्युटी पार्लरचा खर्च परवडण्यासारखा नसतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून ‘जॅझ अप सलून’च्या वतीने आम्ही विवाह करणार्‍या सर्व गरीब शेतकर्‍यांच्या मुला-मुलींचा, नेत्रहीन आणि दिव्यांग स्त्री पुरूषांचा संपूर्ण मेकअप आमच्या सर्व शाखामध्ये मोफत करणार आहे, अशी माहिती जॅझ अप सलूनचे संचालक अशोक अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी दिली आहे.

जे इच्छुक आहेत त्यांनी जॅझ अप सलूनला भेट द्यावयाची आहे. खास करून आपली सुंदर दिसण्याची इच्छा जॅझ अप सॅलून पूर्ण करतेे. जेव्हा आपल्याला सुंदर दिसण्याची इच्छा असेल तेव्हा आपण निश्‍चितपणे जॅझ अप सलूनमध्ये जा आणि प्रशिक्षित सौंदर्य प्रसाधनाद्वारे सेवा घेऊ शकता.

जॅझ अप सलूनचे संचालक अशोक अग्रवाल आणि विशाल अग्रवाल म्हणाले की, पुणे येथील जॅझ अपच्या चार शाखा ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देत आहेत. मुकुंदनगर सुजय गार्डन, औंध, भंडारकर रोड आणि पिंपळे सौदागर मध्ये ब्युटी, मेकअप, केसांची स्टाईलिंग, रंग आणि कटिंग इत्यादी, रोलर ड्रेसिंग, नेत्र ब्रीड, शैम्पू, विविध प्रकारचे फेशियल, फेस पॅक्स, हेड मसाज, बॉडी मसाज इत्यादी सर्व सेवा देत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3