Pimpri : कै. ज्ञानेश्वर धुंदाप्पा देवकुळे यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान आणि मोफत आरोग्य शिबिर उत्साहात

एमपीसी न्यूज – कै. ज्ञानेश्वर धुंदाप्पा देवकुळे यांच्या आठव् या पुण्यस्मरणानिमित्त स्व. ज्ञानेश्वर देवकुळे फाउंडेशन तर्फे नेत्र, दंत, प्लास्टिक सर्जरी तपासणी, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तज्ञ वैद्यांकडून सर्व तपासण्या करण्यात आल्या.

रक्तदान आणि मोफत आरोग्य शिबिरासाठी नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका शर्मिला बाबर, माजी नगरसेविका गीता आफळे, धनंजय काळभोर, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव अनुप मोरे, भाजप पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राजेंद्र बाबर, भास्कर रिकामे, भारतीय ग्राहक मंच पिंपरी चिंचवड अध्यक्ष रमेश सरदेसाई, आपला माणूस पोलीस मित्र संस्थेचे अध्यक्ष सुनील मुदमे, सचिन पांढारकर, मनोज तोरडमल, सलीम शिकलगर, अविनाश धर्माधिकारी, माणिक फडतरे, नरेंद्र येलकर, संकेत गायकवाड आदी उपस्थित होते.

  • रक्तदान शिबिरात एकूण 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 110 ज्येष्ठ नागरिकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच 55 नागरिकांची दंत तपासणी करण्यात आली. आज (रविवारी) सकाळी दहा ते दुपारी एक या कालावधीत निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे या सर्व तपासण्या करण्यात आल्या. नेत्र तपासणी डॉ. सचिन धस, दंत तपासणी डॉ. विशाल भोर, प्लास्टिक सर्जरी तपासणी डॉ. दीपक पाटील यांनी केली. फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत देवकुळे आणि देवकुळे परिवार यांच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले.

ज्ञानेश्वर धुंदाप्पा देवकुळे यांनी सँडविक एशिया कंपनीमध्ये कामगार नेता, कामगार शिक्षक म्हणून 28 वर्ष नोकरी केली. त्यांनतर त्यांनी निगडी प्राधिकरण येथील नागरी समस्या सोडविण्यासाठी राजकीय क्षेत्रात पदार्पण करून विविध प्रश्नांना वाचा फोडली. भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे उपाध्यक्ष, सद्गुरू जंगली महाराज बँकेचे संचालक व उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी सामाजिक समरसता मंचाचे ग्रामीण पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून नेतृत्व केले. तसेच अण्णासाहेब साठे विकास मंडळ निगडी पुणेचे सचिव म्हणून काम पाहिले. शासनाने त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. महाराष्ट्र सार्वजनिक व्याख्यानमाला समिती सदस्य आणि छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पहिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.