Pimpri: मोरवाडीत रविवारी रक्तदान, आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त येत्या रविवारी (दि.10) मोफत रक्तदान व आरोग्य  शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. मोरवाडी, म्हाडा कॉलनीतील एसएनबीपी शाळेत रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हे शिबिर होणार आहे.

यामध्ये सामान्य तपासणी, महिलांची तपासणी, डोळे तपासणी, बालकांची तपासणी केली जाणार आहे. तसेच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक विजय भोजणे यांनी केले आहे.

  • रक्तदात्यांनी नाव नोंदणीसाठी ७३८७४०७८२५ /९९२२५०१७६८ या मोबाईल  वर संपर्क साधावा. शिबिराच्या संयोजनात ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी-चिंचवड , स्वराज्य ग्रुप, विघ्नहर्ता प्रतिष्ठान , मैत्री बौध्द विहार , मनित मित्र मंडळ, म्हाडा सोसायटी , म्हाडा  मोरवाडी  मित्र परिवार यांनी पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.